ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण पत्रकार समितीची मोफत आरोग्य शिबिर उपक्रमाद्वारा सामाजिक बांधिलकी..!

मालवण पत्रकार समितीची मोफत आरोग्य शिबिर उपक्रमाद्वारा सामाजिक बांधिलकी..!

प्रकाशन: 09 Feb 2022 09:02 PM
वाचन संख्या 52

१२ फेब्रुवारी रोजी केले तालुकावासियांसाठी ग्रामीण रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पत्रकार समितीच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते एक यावेळेत तालुकावासियांसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, किडनीविकारासह हाडांच्या आजारावर मोफत तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून होणार आहे.

डॉ. गौरव घुर्ये हे हृदयरोग, श्वसनविकार, मधुमेह व किडनी विकारावर रुग्णांची तपासणी करणार आहे. डॉ. दत्तात्रय ठाकूर हे हाडांचे आजार, मणक्यांचे आजार, सांधेदुखी, संधीवात, हाडांचे इन्फेक्शन यासह अन्य हाडांच्या आजाराच्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिराचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मालवण पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

मालवण पत्रकार समितीच्यावतीने वेळोवेळी सामाजिक उपक्रम आयोजीत केले जातात. कोरोना कालावधीमध्येही प्रशासनाच्या अनेक उपाययोजना व आखणीमध्ये पत्रकारसमितीच्या अभ्यासपूर्ण चर्चा व सूचनांचादेखील अतिशय गांभिर्याने अंतर्भाव केला गेला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स