ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ऍट्रॉसिटीच्या आरोपातून शिवडावचे सत्यवान मेस्त्री निर्दोष.

ऍट्रॉसिटीच्या आरोपातून शिवडावचे सत्यवान मेस्त्री निर्दोष.

प्रकाशन: 09 Feb 2022 08:48 PM
वाचन संख्या 62

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवडाव प्राथमिक शाळेतील शारदोत्सवाच्या कार्यक्रमाच्यावेळी जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातून शाळा व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष सत्यवान अनंत मेस्त्री यांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. ८ ऑक्टोबर २०१६ रोजी शिवडाव येथील प्राथमिक शाळेत शारदोत्सवाच्या कार्यक्रमावेळी जेवण बनविण्यासाठी आलेल्या काही महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३ (१) आर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान, आरोपीविरुद्ध कोणताही सबळ पुरावा न आल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स