ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
एक गाव एक शाळा संकल्पना राबवल्यास शिक्षणाचा दर्जा उंचावेल : प्रताप बागवे, अध्यक्ष माध्यमिक शि.प्र. मंडळ त्रिंबक.

एक गाव एक शाळा संकल्पना राबवल्यास शिक्षणाचा दर्जा उंचावेल : प्रताप बागवे, अध्यक्ष माध्यमिक शि.प्र. मंडळ त्रिंबक.

प्रकाशन: 09 Feb 2022 10:06 PM
वाचन संख्या 99

जनता विद्या मंदिर त्रिंबकचा सत्कार व बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न..

चिंदर | विवेक परब : जनता विद्या मंदिर त्रिंबक या प्रशालेचा सत्कार व बक्षिस वितरण सोहळा आज माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ त्रिंबकचे अध्यक्ष प्रताप सहदेव बागवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शाळेसाठी बहुमोल योगदान देणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी शत्रुघ्न(धकू) त्रिंबककर, सहाय्य शिक्षक सुरेश पवार, त्रिंबक गृप सोसायटी नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालक श्रीकांत बागवे या त्रिमूर्तींचा सत्कार समारंभ पार पडला.
प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे औचित्य विशद केले, माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मधून गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संस्थेकडे ठेवलेल्या ठेवीतून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली, यावेळी सरपंच विलास त्रिंबककर, श्रीकांत बागवे, अशोक बागवे, सौ अर्चना बागवे, विलास हडकर, सुरेंद्र सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. शाळेतील रोडावत चाललेली मुलांची संख्या व इग्लिश मेडियमकडे वाढतचाललेला पालकांचा कल पाहता एक गाव एक शाळा संकल्पना राखवल्यास ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा वाढेल व पटसंख्खा योग्य राहिल असे मत अध्यक्षीय भाषणात प्रताप बागवे यांनी मांडले. यावेळी संचालक एकनाथ घाडी, पोलिस पाटील बाबू सकपाळ, धुरे सर, एकनाथ गायकवाड, साटम, मेंहेदळे, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था कार्यवाह सुरेंद्र (अन्ना)सकपाळ यांनी परिश्रम घेतले. दिवंगत गानसम्राज्ञी भारतरत्न कै. लता मंगेशकर यांना सौ बागवे मॅडम यांच्या कडून गायनातून व सर्व उपस्थितांकडून एक मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या सोहळ्यास मालवणी बाजार शाखा आजरा यांच्या वतीने खाऊवाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी, तर प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक घाडीगावकर सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वारंग सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स