सकल मराठा समाजातर्फे असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांचा सत्कार..
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमनपदी पत्रकार भगवान लोके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कणकवली सकल मराठा समाजातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सकल मराठा समाजातर्फे भगवान लोके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष भाई परब,महेंद्र सांब्रेकर, सुशील सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी,बबलू सावंत,शेखर राणे,पत्रकार भगवान लोके यांच्यासह सकल मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)