ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दहीबांव येथील एमसीसी चषक क्रिकेट स्पर्धेत लाली स्पोर्टस् क्लबने मारली बाजी..!

दहीबांव येथील एमसीसी चषक क्रिकेट स्पर्धेत लाली स्पोर्टस् क्लबने मारली बाजी..!

प्रकाशन: 01 Feb 2022 12:32 PM
वाचन संख्या 56

४४ संघांमध्ये पटकावले खुल्या अंडरआर्म स्पर्धेत विजेतेपद ..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील दहीबांव येथे श्री.महादेश्वर क्रिकेट क्लब पुरस्कृत खुला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत लाली स्पोर्ट्स दहीबांव संघाने रोमहर्षक विजय मिळवत एमसीसी
चषक पटकाविला. गांगेश्वर पाटथर संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
क्रिकेटपटू सदाशिव उर्फ लाली परब यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत ४४ संघ सहभागी झाले होते.
अंतिम विजेत्या लाली स्पोर्ट्स दहीबांव
संघास १० हजार एक रुपये व चषक तर उपविजेत्या गांगेश्वर पाटथर संघास ७,हजार एक रुपये व चषक, तृतीय जयंतीदेवी पळसंब संघास ३ हजार एक रुपये व चषक, चतुर्थ वीर मांडकरी वरेरी संघास १ हजार पाचशे रुपये व चषक, उत्कृष्ट गोलंदाज एकनाथ परब, फलंदाज तेजस परब, मालिकावीर विपीन कोंडसकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास दहीबांव बागमळा ग्रामपंचायत माजी सरपंच शरद परब,सेवानिवृत्त नायब तहसिलदार अशोक परब,पोलीस पाटील संजय परब,ग्रा.सदस्य सुशिल चेंदवणकर,रमेश परब,सूर्यकांत शिरवंडेकर,लवू घाडी,गंगाराम परब,मधुकर परब,सचिन माणगांवकर,निलेश परब,एकनाथ परब,बंडू परब,रवींद्र दळवी,नागेश परब,दिनेश खोत,प्रसाद परब,ओंकार घागरे,आदींसह क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स