शिवसेनेर्फे आयोजीत ई श्रमकार्ड शिबिराची मालवणात उत्स्फूर्त सुरवात.
नगरसेवक श्री यतिन खोत यांच्या प्रभाग नियोजन पुढाकाराने शिबिराचे आयोजन
मालवण | सहिष्णू पंडित (सहसंपादक) : आज शिवसेनेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे ई श्रमकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेर्फे आज 1 फेफ्रुवारी आणि उद्या 2 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 04 असे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील करोडो लोकांसाठी ई-श्रम कार्ड सुरू केले. सरकारने ई-श्रम पोर्टल देखील सुरू केले, जिथून कामगारांना त्यांचे कार्ड बनवता येतील. यानंतर या कार्डधारकांना सरकारकडून बरीच मदत दिली जाईल आणि त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळेल. हे कार्ड बनवण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे असंघटित क्षेत्रातील लोकांना हे कार्ड लाभदायक ठरेल. सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल. सरकार असंघटित क्षेत्रासाठी जी काही योजना आणेल, त्याचा थेट लाभ या कार्डधारकांना दिला जाईल किंवा ज्या काही योजना चालू आहेत, त्यांनाही लाभ मिळेल. कोणतेही श्रमिक प्रशिक्षण घेतले नसेल, तर सरकार या कार्डद्वारा प्रशिक्षणाचीही व्यवस्था करु शकेल जेणेकरून सहजपणे नोकरी करणे शिकता येईल किंवा असलेल्या नोकरीतही मदत होईल.स्थलांतरित कामगारांचाही मागोवा घेण्यास मदत केली जाईल .एका राज्यातून दुसर्या राज्यात कमावण्यासाठी जाणार्यांची माहितीही सरकारला कळेल आणि त्यानुसार सरकारकडून कल्याणकारी कामे केली जातील. याद्वारे रोजगारात मदत उपलब्ध होईल. सरकार सर्व कामगार, कामे इत्यादींची तारीख घेऊन हा डेटा कंपन्यांसोबत शेअर करेल, जेणेकरून कंपन्यांच्या गरजेनुसार थेट रोजगार मिळेल. पीएम सुरक्षा विमा योजनेचाही लाभ मिळेल, ज्या अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा देखील दिला जाईल. यामध्ये सरकारकडून एक वर्षाचा प्रीमियम दिला जाईल.
मालवणमधील हे ई श्रमकार्ड शिबिर मालवणचे नगरसेवक श्री यतिन खोत यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे तरी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून उद्याही इच्छुकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाला जोडलेल्या आधारकार्ड व बॅन्क पासबुकसोबत हजर राहून याचा लाभ घ्यायचे आवाहन मालवण नगराध्यक्ष, शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये सामान्य नागरीकांना त्यांचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाला लिंक करुन द्यायची स्वतंत्र सेवा व्यवस्था नगरसेवक श्री यतिन खोत यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)