ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कसालच्या कसालकरवाडीतील अनेक तरुण शिवबंधनात..!

कसालच्या कसालकरवाडीतील अनेक तरुण शिवबंधनात..!

प्रकाशन: 01 Feb 2022 03:02 AM
वाचन संख्या 48

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालमधल्या कसालकरवाडी येथील अनेक तरुणांनी रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कसालकर वाडी येथील समाजमंदिर येथे आम. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून, पक्षाच्या शाली देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.

आमदार वैभव नाईक यांची कार्यपद्धती तसेच शिवसेनेच्या माध्यमातून कसाल मध्ये होत असलेला विकास यांनी प्रेरित होऊन आपण शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्या तरुणांनी सांगितले. यामध्ये मंगेश कसालकर, प्रकाश कसालकर, सत्यवान कसालकर, संतोष कसालकर, संदीप कसालकर, अंकित कसालकर, एकनाथ कसालकर, राजन पवार, महेंद्र पवार, गौरेश कसालकर, महेश कसालकर, प्रकाश कसालकर, सागर कसालकर, रविराज कसालकर, निलेश कसालकर यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
यावेळी शिवसेनेचे अवधूत मालणकर, सुजित जाधव, बाळा कांदळकर, डॉ. बालम, अरुण राणे, ग्रा. प. सदस्य गणेश मेस्त्री, पांडुरंग गावडे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स