ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आम. वैभव नाईक यांनी सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांची घेतली भेट.   

आम. वैभव नाईक यांनी सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांची घेतली भेट.   

प्रकाशन: 01 Feb 2022 02:51 AM
वाचन संख्या 65

लोककलाकारांचे मानधन  २२५० रु. वरून ५ हजार रु.करायचा प्रस्ताव.

कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यांची  मुंबई येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिनेश गोरे, समीर तेंडुलकर यांनी आज  भेट घेतली.कोरोनाच्या कालावधीसाठी  कलाकारांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ५ हजार रु.अनुदानासाठी  स्वीकारलेले  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी व भजनी कलाकारांचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी आम. वैभव नाईक यांनी केली. त्यावर श्री चवरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रस्ताव मंजूर  करण्याचे  आदेश संबंधितांना दिले.
त्याचबरोबर कोविड पार्श्वभूमीवर  दशावतारी कलाकारांच्या कंपनींना  एक रक्कमी १ लाख रुपये रक्कम अनुदान तत्वावर  दिली जाणार असून त्यासाठी जेवढे प्रस्ताव आलेत त्या सर्वांना मंजुरी देण्यासंदर्भात चर्चा झाली. वृद्ध  कलाकारांचे मानधन  २२५० रुपये वरून ५ हजार रुपये करण्याची मागणी आम.वैभव नाईक यांनी केली. त्याबाबत  सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मानधन वाढीसंदर्भात निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा दरवर्षी मुंबई येथे होणारा दशावतारी नाट्य महोत्सव यावर्षी कुडाळ मध्ये घेण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली. त्यावर देखील  सकारात्मक चर्चा झाली आहः अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स