ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ब्राम्हण देव सुकळवाड संघाला आचरा वाडोळी प्रिमिअर लिगचे विजेतेपद..!

ब्राम्हण देव सुकळवाड संघाला आचरा वाडोळी प्रिमिअर लिगचे विजेतेपद..!

प्रकाशन: 01 Feb 2022 02:38 AM
वाचन संख्या 290

शेष इलेव्हन रेवंडी व्दितीय तर जय भवानी काळेथर तृतीयस्थानी.

चिंदर | विवेक परब : देव वाडोळी क्रिडामंडळ आचरा भंडारवाडी मैदानावर 26 जानेवारी पासुन सुरु झालेल्या वाडोळी प्रिमिअर लिग स्पर्धेत ब्राम्हण देव सुकळवाड संघाने शेष इलेव्हन रेवंडी संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला. शेष इलेव्हन संघाला व्दितीय, जय भवानी काळेथर-तृतिय तर महापुरुष रेवतळे संघाने चतुर्थ क्रमांक मिळवीला. विजेत्या संघाना रोख रक्कम आणि चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेत मालिकावीर म्हणून जतिन कांबळी (रेवंडी), उत्कृष्ट फंलदाज म्हणून विशाल लुडबे (रेवंडी), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रितेश लोणे (रेवंडी),उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हरेश बांदेकर (सुकळवाड), उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून कौस्तुभ मसुरकर तसेच अंतिम सामना सामनावीर म्हणून आबा दळवी (सुकळवाड) यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
बक्षिस वितरणासाठी जिजा टेमकर, बाबू परुळेकर, जनार्दन आचरेकर, जयवंत गावकर, विलास जाधव, बाबाजी भिसळे, लक्ष्मणराव आचरेकर, मंदार सरजोशी, मुजीब शेख, व ग्रामस्थ-मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन डि, एस्, परब यांनी केले.



  

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स