ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विज्ञान प्रदर्शनात मालवणचे रोझरी इंग्लिश स्कूल प्रथम..!

विज्ञान प्रदर्शनात मालवणचे रोझरी इंग्लिश स्कूल प्रथम..!

प्रकाशन: 21 Jan 2022 06:20 PM
वाचन संख्या 134

शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : शासकीय तंत्रनिकेतन मालवण आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या ओम सुमित मसुरकर व देवम रवींद्र मयेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील यानी केले तर बक्षीस वितरण सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांच्या हस्ते पार पडला. कोविड-१९ च्या कठीण काळात सुद्धा ऑनलाइन प्रदर्शनामध्ये जिल्ह्यामधील आठ शाळां मधून एकूण 13 विद्यार्थी सहभागी झाले होते. उर्वरित निकाल पुढील प्रमाणे; द्वितीय क्रमांक प्रगत विद्यामंदिर रामगड च्या केतन उल्हास सावंत व प्राची उल्हास तारी, तृतीय क्रमांक कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुडाळच्या प्रथमेश प्रशांत केरवडेकर आणि विश्वजीत अविनाश परीट तर उत्तेजनार्थ म्हणून बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ ची विद्यार्थिनी पर्णीका अनिरुद्ध गोलतकर हिची निवड करण्यात आली.

परीक्षक म्हणून शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राध्यापक डॉ. योगेश महाडिक आणि प्राध्यापक सचिन राजाध्यक्ष यांनी काम पाहिले तर प्राध्यापक दत्तप्रसाद गोलतकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे यु ट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स