ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत सकल मराठा समाज आक्रमक…!

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत सकल मराठा समाज आक्रमक…!

प्रकाशन: 21 Jan 2022 06:01 PM
वाचन संख्या 80

भूमीअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक श्री. परब यांची घेतली भेट; शिवाजी महाराज स्मारक जमिनीबाबत घेतली माहिती..

कणकवली / उमेश परब(सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी पुतळा स्थलांतर लवकरात लवकर व्हावे, यासाठी तालुका सकल मराठा समाज नेहमीच पाठपुरावा करत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मराठा समाज कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कणकवली भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधिक्षक सुनील परब यांची भेट घेतली. प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची जमीन मोजणी झाल्यानंतर पुढील कारवाई काय झाली? याबाबत माहिती घेतली.त्यावर भूमीअभिलेख उपअधीक्षक सुनील परब यांनी सदर प्लॉट सरासरी वीस गुंठे क्षेत्र भरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तातडीची मोजणी आम्ही केली.पालकमंत्री उदय सामंत यांनी सदर प्लॉट मोजणी करत शिवाजी महाराज स्मारक व स्टॉल धारकांसाठी जागेच्या उपलब्धतेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार अधिकृत मोजणी केली असून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल कणकवली तहसील कार्यालयात येत्या दोन दिवसांत सादर करणार असल्याचे सकल मराठा समाज कार्यकर्त्यांना श्री. परब यांनी सांगितले. त्यावेळी मराठा समाज कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी,मुळातच महाराजांच्या पुतळा स्थलांतराला भरपूर वेळ गेलेला आहे. त्यामुळे आम्ही हा पाठपुरावा करत असल्याचे अध्यक्ष भाई परब यांनी सांगितले. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष भाई परब,महेंद्र सांब्रेकर, सुशील सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी,बबलू सावंत,शेखर राणे यांच्यासह सकल मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स