ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्रावण गांवचे श्री.गणेश चव्हाण ठरले उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराचे मानकरी..!

श्रावण गांवचे श्री.गणेश चव्हाण ठरले उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराचे मानकरी..!

प्रकाशन: 20 Jan 2022 05:55 PM
वाचन संख्या 127

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावण येथील पत्रकार श्री. गणेश चव्हाण यांना जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र युनियन तर्फे उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातुन ८ आदर्श पत्रकारांची निवड करण्यात आली होती. या आठ पत्रकारांमधुन रत्नागिरी व सिंधुदुर्गातुन पत्रकार गणेश चव्हाण यांची ग्रामीण मधुन उत्कृष्ठ पत्रकार म्हणुन निवड केली. हा गौरव सोहळा मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत मिरारोड येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी युनियनचे प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ होते. महापौर व आयुक्त यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव करून पत्रकार हा समाजाचा कणा आहे. समाजविकासाबद्दल लिखाण करून, समाज जागृती करण्याचे काम पत्रकार करत असतो. म्हणून त्यांचा विशेष आदर वाटतो. अशा शब्दांत कौतुक केले. यावेळी जर्नालिष्टचे सर्व पदाधिकारी, मुणगे देवगड येथील मुंबई विद्यापिठाचे प्राचार्य हेमंत सामंत, सिंधुदुर्गाचे संपर्क प्रमुख आडवलीचे सतिश साटम व पत्रकार उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स