कै. सतिश धुळे स्मरणार्थ वायंगणी प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…! (क्रिडाविशेष)
ओमसाई प्रासादिक भजन मंडळ यांच्यावतीने आयोजन.
चिंदर | विवेक परब (क्रिडाविशेष) : मालवण तालुक्यातील वायंगणी येथे १ फेब्रुवारीला ओमसाई प्रासादिक भजन मंडळ यांच्यावतीने कै. सतिश धुळे स्मरणार्थ ‘वायंगणी प्रिमिअर लीग’ स्पर्धेनिमित्त स्थानिक टेनिसबाॅल क्रिकेट खेळाडूंचा मेळा आयोजित करण्यात आला आहे.
आय.पि.एल.च्या धर्तीवर लिलाव पध्दतीने खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेचे ठिकाणी ‘वायंगणी नळेवाडी’ हे असेल .
प्रथम पारितोषिक-१५०००, व्दितीय पारितोषिक-१०००० व चषक व इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम तारीख २२जानेवारी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
प्रवेशासाठी खालील व्यक्तिंशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.
(सचिन रेडकर-897551850, प्रतिक सावंत-7030708229, जय सावंत-8693893128.)
या स्पर्धेच्या निमित्ताने मालवण तालुका व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना चुरशीची क्रिकेट मेजवानीच पहाता येणार असल्याने व व्यावसायिक टेनिसबाॅल क्रिकेटला चालना मिळत असल्याने अधिकाधिक क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेला उपस्थिती राखावी असे जिल्ह्यातील तज्ञ व ज्येष्ठ क्रिकेटपटूंचे मत आहे व आयोजकांचे विचार विनम्र आवाहनही आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)