राष्ट्रीय खेळाडू रिद्धी हडकरचा आस्था ग्रुप मालवणतर्फे होणार नागरी सत्कार…! (क्रिडाविशेष)
उद्या दिनांक 21 जानेवारीला बहुसंख्य क्रिडारसिक व नागरीकांच्या उपस्थितीत गौरवली जाणार मालवणची सुकन्या..!
भंडारी हायस्कूल ठरणार मालवणच्या क्रीडा ऐतिहासिक नागरी घटनेचे साक्षस्थळ…..!
मालवण / विशेष प्रतिनिधी (क्रिडाविशेष ): राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी मालवणची सुकन्या कबड्डीपटू रिद्धी नितीन हडकर हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. याबद्दल आस्था ग्रुपच्या वतीने रिद्धी हडकर हिचा नागरी सत्कार शुक्रवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भंडारी हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील क्रीडा क्षेत्रातील संस्थांना आणि क्रीडाप्रेमींना सहभागी करून घेण्यात येणार आहे अशी माहिती आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांनी दिली आहे.
मालवणचा आस्था गृप नेहमीच सत्वगुणी सामाजिक,सांस्कृतिक,आरोग्यविषयक,क्रिडाअनुकूल चळवळींना प्रोत्साहीत करत आलेला आहे. हा नागरी सत्कारही त्यातील एक राष्ट्रीय पैलूवर प्रकाश टाकून संपूर्ण शहराला एक चैतन्याची आस्था जागवणाराच असेल अशी मालवण व जिल्हा क्रीडावर्तुळात समाधानाची चर्चा आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)