ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
साळशी येथील मोडिलिपी तज्ञ  बळीराम सिताराम गांवकर यांचे निधन

साळशी येथील मोडिलिपी तज्ञ बळीराम सिताराम गांवकर यांचे निधन

प्रकाशन: 15 Jan 2022 04:24 PM
वाचन संख्या 103

शिरगाव/संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी गावचे सुपुत्र तथा मोडिलिपी तज्ञ बळीराम सिताराम गांवकर यांचे पनवेल येथे नुकतेच वृधापकालाने निधन झाले. साळशी गावच्या इनाम देवस्थानची ऐतिहासिक माहिती जतन करण्यासाठी स.न.२००८ मधे त्यानी एक पुस्तक प्रकाशित केले आहे.त्यासाठी अनेक अडणीना सामोरे जावे लागले होते. ते मोडीलिपीचे जाणकार होते. त्यामुळे साळशी गावची ऐतिहासिक माहिती संकलित करून पुस्तक प्रकाशित केले. नोकरी निमित्त पनवेल येथे स्थायिक झाले होते. तेथील सिंधुदुर्ग हितवर्धक संघाचे सभासद व सल्लागार मार्गदर्शक होते. नोकरी निमित्त पनवेल रहात असले तरी त्याना गावची ओढ कायम होती. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ चुलत भाऊ पुतणे जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मोडिलिपीतील जुने जाणकार व्यक्तिमत्व हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स