ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे विनोद तावडे, रवींद्र चव्हाण यांच्याकडून अभिनंदन

जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे विनोद तावडे, रवींद्र चव्हाण यांच्याकडून अभिनंदन

प्रकाशन: 15 Jan 2022 07:48 PM
वाचन संख्या 40

नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी यांना देखील दिल्या शुभेच्छा

कणकवली / उमेश परब – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा बँक उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच नवनिर्वाचित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना देखील श्री. तावडे व श्री. चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँक निश्चितपणे देशात आपला कामाचा ठसा उमटवेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची सांगड घालत बँक शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी विशेष प्रयत्न करेल असा विश्वासही श्री तावडे व श्री चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स