हेदूळ आरोग्य उपकेंद्राला ऑफिस टेबल भेट
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील हेदूळ गावातील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य वर्धिनी केंद्राला आवश्यक असणारे ऑफिस टेबल सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक एस. पी. सामंत यांनी भेट दिले. यावेळी सरपंच श्री. नंददिपक गावडे, डाॅ. महादेव हरमळकर, आरोग्य सेवक राजन गवस, सौ. शलाका नार्वेकर, सारिका चव्हाण आदी उपस्थित होते. या मदतीबद्दल श्री. सामंत यांचे आभार मानण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)