ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
देवगड तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

देवगड तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

प्रकाशन: 13 Jan 2022 09:12 PM
वाचन संख्या 169

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जलमगावी पोंभुर्ले येथे २० फेब्रु.ला पुरस्कार वितरण सोहळा

शिरगाव /संतोष साळसकर : देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०२१-२२ या वर्षातील दिला जाणारा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड समितीच्या विशेष सभेत जाहीर करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले जलमगावी २० फेब्रु. रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. देवगड तालुका पत्रकार समितीची विशेष सभा समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श जेष्ठ पत्रकार पुरस्कार-आनंद लोके, शहरी विभागासाठी-राजीव मधुकर पडवळ,ग्रामीण विभागासाठी-पेंढरी येथील विलास गुरव यांना आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच विशेष सन्मान पुरस्कारासाठी-देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल खडपकर यांची निवड करण्यात आली आहे.या सर्व पुरस्काराचे वितरण पोंभुर्ले येथे २० फेब्रु. रोजी होणार आहे.यादिवशी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती अध्यक्ष श्री गावकर यांनी दिली.यावेळी समितीचे उपाध्यक्ष दयानंद मांगले, उपाध्यक्ष अनिल राणे,सचिव सचिन लळीत, आचरेकर, संतोष कुळकर्णी, सुरज कोयंडे,राजेंद्र मुंबरकर, वैभव केळकर,विष्णू धावडे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स