पळसंब येथे प्रधानमंत्री आवास घरकुलचे मालवण पं.स. गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्याहस्ते भूमिपूजन
आचरा/विवेक परब :पळसंब येथे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला. पळसंब गावठणवाडी येथील श्री.नामदेव पुजारे याच्या मंजूर असलेल्या प्रधानमंत्री आवास घरकुल चे भूमिपूजन पंचायत समिती मालवण गटविकास अधिकारी श्री. जयेंद्र जाधव याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, श्री. पी. डी . जाधव, श्री.गोसावी ग्रामसेवक, श्री. अमित कांबळी, ग्रा.प. सदस्य श्री .एकनाथ चिंचवलकर, श्री. अरुण माने, सौ. प्रणिता पुजारे, सौ. उज्वला पुजारे, कर्मचारी शैलेद्र अणावकर, अमित पुजारे, प्रमोद सावंत, रविकांत सावंत, विजेश परब, मुरलीधर पुजारे, मृणाली पुजारे, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)