ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांद्यात  सत्यवान रेडकर  यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला उस्फुर्त प्रतीसाद

बांद्यात सत्यवान रेडकर यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला उस्फुर्त प्रतीसाद

प्रकाशन: 13 Jan 2022 11:03 PM
वाचन संख्या 116

बांदा | राकेश परब : बांदा शहरातील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा मध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेएशन, श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व गणेश राउळ मित्र मंडळ यांच्या सयुक्त विद्यमानाने आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमाचे उदघाटन बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी व बांदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्यामराव काळे यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलीत करून झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेएशनचे पदाधिकारी महीला जिल्हा अध्यक्षा सौ दर्शना केसरकर , उपाध्यक्ष मिलींद धुरी, आनंद कांडरकर, श्री साईबाबा भक्तसेवा मंडळचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, विश्वस्त साईराज सांळगावकर, सांळगावकर,खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर,पि.एस.सावंत मान्यवर उपस्थित होते. या वेळी तिमिरातुन तेजाकडे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री सत्यवान रेडकर यांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेएशनच्या वतीने शाल ,श्रीफळ, सन्मान चिन्ह देउन बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांच्या हस्ते सन्मान केला.या कार्यक्रम अध्यक्ष काळे यानी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येक विद्यार्थानी जिद्द ठेवुन, स्पर्धा परीक्षेची तैयारी करून व मेहनत घेऊन यश संपादन केले पाहीजे.आपण इंजीनीयर,डॉव्टर,आय पी एस ,कलेव्टर बनुन आपल्या वडीलांच, गावाच नाव उज्वल करा.तलाठी वर्षा नाडकर्णी यानी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या,व शासकीय अधिका-याच गाव मार्गदर्शक सत्यवान रेडकरच स्वन्प पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. मुख्याध्यापक पावसकर सरानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी जिवनात फार महत्वाचे आहे. यातुन तुम्ही आपले यशस्वी जीवन घडवु शकता.मार्गदर्शक रेडकर यानी आपण कसा घडलो प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी मेहनत करा जिद्द उराशी बाळगा व सरकारी अधीकारांचे गाव हे माझ स्वन्प पूर्ण करा, या कार्यक्रमाच्या शेवटी अनेक विद्यार्धि , विद्यार्थिनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करून रेडकरांचे आभार व्यक्त करुन उस्फुर्त प्रतिसाद दिला. राकेश केसरकर मान्यवरांचे आभार मानले ,कार्यक्रमाचे सुसंचालन पि.एस सावंत यानी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स