ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साळशी येथे भर वस्तीत बिबट्याचा वावर वृत्त प्रसिद्ध होताच वनरक्षकांची साळशी गावाला भेट

साळशी येथे भर वस्तीत बिबट्याचा वावर वृत्त प्रसिद्ध होताच वनरक्षकांची साळशी गावाला भेट

प्रकाशन: 11 Jan 2022 10:13 PM
वाचन संख्या 254

आपली सिंधूनगरी च्या वृत्ताची वनखात्याकडून तात्काळ दखल

शिरगाव/संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी येथे भरमानवी वस्तीत बिबट्यांची दहशत असे आपली सिंधूनगरीने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. परिसरातील ग्रामस्थ शेतकरी यांचे पाळीव कुत्रे,मांजरे यांचे या बिबट्याने लक्ष केले होते.गेले अनेक दिवस या बिबट्याचा वावर असल्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या वृत्ताची संबंधीत वनविभागाने दखल घेवून वनरक्षक निलेश साठे यानी तातडीने साळशी गावात संबंधीत रहिवासी यांची भेट घेवून परिसराची पाहणी केली ग्रामस्थांबरोबर चर्चा करत मनातील भिती दूर केली तसेच खबरदारीचे घेण्यासाठी मार्गदशन व उपाययोजना सांगितली. यावेळी गावच्या पोलीस पाटील सौ.कामिनी नाईक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स