नांदगाव-मधलीवाडी प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ.प्रियांका भोगले यांचा गणपतीपुळे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मान
शिरगाव /संतोष साळसकर : अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२२ कणकवली तालुक्यातील नांदगाव-मधलीवाडी प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ.प्रियांका विजय भोगले यांना नुकताच गणपतीपुळे येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन चे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार , दक्षिण भारत विभागीय अध्यक्ष उज्वला सातपुते,कोकण विभागीय अध्यक्ष आबासाहेब पवार,प्राचार्य व लेखक कुऱ्हाडे,उद्योगपती सुनील नारकर,दीपक सावर्डेकर,संदीप परवल कर,श्रीमती जांभोकर,पुरस्कार निवड समिती सदस्या स्मिता नलावडे,महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा जिल्हाध्यक्ष विजय भोगले आदी मान्यवर उपस्थित होते.
कलमठ-कणकवली शाळा नं-१ या शाळेतून काम करताना सौ.भोगले यांच्या विद्यार्ध्यानी जिल्हास्तरावर समूहगान,समूहनृत्य मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे,गटशिक्षणाधिकारी किशोर गवस,शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे,शिक्षण विस्तार अधिकारी राऊत तसेच महापुरुष सेवासंघ नांदगाव व नांदगाव-मधलीवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामस्थ, पालक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.सौ.प्रियांका भोगले या देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी असून त्यांनी शिक्षणक्षेत्रात चाफेड गावचे नाव रोशन केल्याबद्दल त्यांचे चाफेड पंचक्रोशीतूनही विशेष अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)