पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने महामृत्युंजय जपाचे आयोजन
वेंगुर्ले चे ग्रामदैवत रामेश्वर चरणी महामृत्युंजय जप करुन पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभण्यासाठीची मागणी
आचरा-विवेक परब : पंजाब दौर्यावर असताना देशाचे लाडके पंतप्रधान मान.नरेंद्रभाई मोदी यांच्या सुरक्षीतेत पंजाब मधील काँग्रेस सरकारने हेतुपुरस्सर कुचराई केली त्यामुळे पंतप्रधानांच्या जिवीताला धोका निर्माण झाला. शत्रूच्या षडयंत्रापासुन त्यांचे रक्षण व्हावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री.देव रामेश्वर चरणी महामृत्युंजय जपाचे आयोजन करण्यात आले होते.
महामृत्युंजय जपाचे पौरोहित्य विश्व हिंदु परिषद, वेंगुर्लेचे प्रखंड प्रमुख अरुण गोगटे यांनी केले. यावेळी पुरोहित म्हणून ब्राम्हण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत रानडे, कीरण ताम्हणकर, अजित दामले, मयुरेश फाटक, कौशल नातु यांनी महामृत्युंजय जपाचे पठण केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व महिला मोर्चा च्या ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर यांनी गणेश पुजन करून महामृत्युंजय जपाची सुरुवात केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, महीला मोर्चा च्या अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल व बाळा सावंत, नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी, विश्व हिंदु परिषदेचे महामंत्री आपा धोंड, आशिष पाडगावकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटनीस समीर कुडाळकर, ता.का.का.सदस्य बिट्टु गावडे, किसान मोर्चा चे ज्ञानेश्वर केळजी, महिला मोर्चा च्या रसीका मठकर – वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)