जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग.जाहीर आवाहन.
ओरोस /प्रतिनिधी : भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नेहरु युवा केंद्र, सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या ग्रामीण संस्थांना जिल्हा उत्कृष्ट मंडळ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
ग्रामीण क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या युवा मंडळ, महिला मंडळ यांचे व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर, साक्षरता अभियान, सामाजिक चळवळ, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम, कुटुंब कल्याण, गरिबी निवारण कार्यक्रम, पर्यावरण, पिण्याचे पाणी, श्रमदान, ग्रामीण विकास योजना याद्वारे ग्रामीण विकास प्रक्रियेत आपले योगदान असावे, अशा युवक मंडळे, महिला संस्थांना जिल्हा पुरस्कार रोख रुपये 25 हजार रुपये आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या मंडळांची शिफारस राज्यस्तरावर करण्यात येईल. राज्य पुरस्काराचे स्वरुप रुपये एक लाख आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार रुपये दोन लाख , तीन लाख व पाच लाख असे आहे. मंडळाचे कार्य हे एप्रिल http://localhost/news/public/uploads/2020 ते मार्च http://localhost/news/public/uploads/2021 या कालावधीतील असावे.
या कार्यक्रम राबविण्यास सलग्नं मंडळ, संस्थांनी प्रत्यक्ष कार्याचा फोटो, वर्तमानपत्र कात्रणे, प्रमाणपत्र, मागील वर्षाचा लेखापरिक्षण , मंडळ नोंदणी प्रमाणपत्र यांच्यासह विहित नमुन्यातील अर्ज 17 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत नेहरु युवा केंद्र, जिल्हाधिकारी प्रशासकीय संकुल, तळमजला , सिंधुदुर्गनगरी येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)