स्वराली मुणगेकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालक्यातील परांजपे मोतीवाले या विद्यालयाची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी स्वराली सतिश मुणगेकर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून चिपळूण तालुका गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक व रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत ११६ वा क्रमांक मिळविला आहे. मूळ देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र सतीश मुणगेकर यांची स्वराली ही कन्या आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे मार्गदर्शक शिक्षक, वडील आविष्कार फाऊंडेशन इंडियाचे गुहागर तालुका अध्यक्ष सतिश मुणगेकर व आई संस्कृती मुणगेकर यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)