बांदा दोडामार्ग रस्त्याच्या डांबरीकरचा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
बांदा /राकेश परब : बांदा ते दोडामार्ग रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत होता. अखेर कामाला काल या रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला. माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यापुढे हा रस्ता अनेक वर्षे टिकावा यासाठी म्हणून अतिरिक्त १०० कोटी रूपयांसह एकूण ११८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. आहे. या रस्त्यासाठी अनेक पक्षांकडून आंदोलने झाली होती. त्यावेळी त्यांना अनेक वेळा बांधकाम खात्याकडून आश्वासने देण्यात आली होती. सदर रस्ता वीस ते पंचवीस दिवसांत पुर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. बांदा ते दोडामार्ग रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहीती खुद्द माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी येथे दिली. बांदा दोडामार्ग रस्ताची अक्षरशः चाळण झाली असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाळ्यामध्ये ही मोठ्या खड्यात पाणी साचून राहील्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होत होते. यामुळे आता वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी शिवसेना उपतालुकप्रमुख भैय्या गोवेकर, शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, नारायण राणे, मंगलदास देसाई, पांडुरंग नाटेकर, ओंकार नाडकर्णी, संजय आईर, पिंट्या गायतोंडे, ज्ञानेश्वर येडवे, सुनील नाटेकर, राकेश वाळके, संदेश पावसकर, निखिल मयेकर, अशोक परब, ठेकेदार रोहित नाडकर्णी, बांधकाम शाखा अभियंता विजय चव्हाण आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)