भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अनाथांची माय - सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आचरा/विवेक परब : अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना भाजपा वेंगुर्ले च्या वतीने साईदरबार हाॅल येथे श्रद्धांजली वहाण्यात आली . तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर यांचे हस्ते सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्रद्धांजली वहाताना अॅड. सुषमा खानोलकर व डाॅ. पुजा कर्पे यांनी सिंधुताई सपकाळ यांचा जिवनपट मांडताना अनाथ मुलांसाठी केलेले कार्य, तसेच शेकडो अनाथ बालकांना अन्न , वस्त्र , निवारा , शिक्षण , आरोग्य आणि स्वतंत्र ओळख मिळवून देणारी त्यांची माई आणि समाजात ” सिंधुताई ” म्हणून ख्यातनाम झाली अशी श्रद्धांजली वाहीली.
या श्रद्धांजली सभेला जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, महीला तालुकाध्यक्षा स्मिता दामले , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल व बाळा सावंत, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, नगरसेविका पुनम जाधव – कृपा मोंडकर – श्रेया मयेकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, परबवाडा सरपंच पपु परब, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे, ता .चिटनीस समीर चिंदरकर – समीर कुडाळकर , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु, ता.का.का.सदस्य बिट्टु गावडे , महिला मोर्चा च्या रसीका मठकर – मानसी परब , बुथप्रमुख शेखर काणेकर – नितीश कुडतरकर – विनय गोरे – गुरुनाथ घाडी – वसंत परब – नारायण गावडे, युवा मोर्चा चे भुषण सारंग, ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)