ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जेष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रकार भालचंद्र शिवराम तथा बाळ ठाकूर वयाच्या 92वर्षी काळाच्या पडद्याआड

जेष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रकार भालचंद्र शिवराम तथा बाळ ठाकूर वयाच्या 92वर्षी काळाच्या पडद्याआड

प्रकाशन: 09 Jan 2022 12:12 PM
वाचन संख्या 251

आचरा /विवेक परब : भालचंद्र शिवराम तथा बाळ ठाकूर यांनी 1948 साली मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईमधून फाईन आर्टची पदवी घेतली. कोकणच्या लाल मातीत जन्मलेले व इथेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन मुसाकाजी बंदरातून बोटीने मुंबईला गेलेल्या बाळ ठाकूर यांच्या उपजत चित्रकलेला मुंबईने नाव मिळवून दिले व ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार ठरले. मराठी पुस्तके आणि नियतकालिकांच्या मुखपृष्ठ रेखाटनांचे सुमारे सहा दशके काम करून स्वत:ची वेगळी शैली निर्माण केलेले ज्येष्ठ चित्रकार भालचंद्र शिवराम ऊर्फ बाळ ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आहेत.

ठाकूर यांचा जन्म २४ एप्रिल १९३० रोजी लांजा तालुक्यातील भांबेड येथे झाला.

मुंबईच्या सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमधून १९४८ मध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली. ‘जे. वॉल्टर थॉम्प्सन’, ‘अय्यर्स’, ‘उल्का’ अशा जाहिरात संस्थांत त्यांनी काही काळ नोकरी केली.

१९५० नंतर ठाकूर मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे, मांडणी आणि संकल्पनांचे काम करू लागले. रेषेवर प्रभुत्व असल्यामुळे रेखाटने करण्याबरोबरच जलरंग वापरूनही त्यांनी चित्रे रेखाटली. साहित्याची उत्तम जाण असल्याने संबंधित लेखनाला अतिशय अनुरूप रेखाटने करण्यासाठी ते नावाजले गेले. ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘ललित’ यांसारख्या मराठी साहित्य विश्वातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नियतकालिकांसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्याचप्रमाणे लक्ष्मीबाई टिळकांपासून बालकवी, मर्ढेकर, बा.भ. बोरकरांपर्यंत अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे त्यांनी रेखाटलेली आहेत. प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांचे ‘आत्मकथा’, ‘प्रतिबिंब’, याशिवाय ‘गणूराया’ आणि ‘चानी’ तसेच कै. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांचीही मुखपृष्ठेही बाळ ठाकूर यांच्या कल्पनेतून साकारलेली आहेत.[

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स