भाजपा दिव्यांग आघाडी चा एस. टी.कर्मचारी संपास पाठींबा..!
ब्यूरो न्यूज / विवेक परब : एस. टी.कर्मचार्यांनी पुकारलेला बंद त्यांच्या न्याय मागण्यांसाठीच आहे . त्यांना न्याय येण्याअगोदरच संप मोडीत काढणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे . तसेच शासनाचे हे कामगार विरोधी धोरण लक्षात घेऊन या चळवळीत भाजपा दिव्यांग आघाडी सुद्धा उतरली आहे . एस. टी.सेवा बंद असल्याने दिव्यांगांना फार अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कर्मचारयांचा सहानभुतीपूर्वक विचार करुन या कर्मचारयांना शासनामध्ये विलीन करावे ही आग्रही मागणी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांनी केली. त्यांनी आपल्या दिव्यांग भगिनी व बांधवांसोबत कणकवली डेपो येथे जाऊन आंदोलन करणारया एस्. टी.कर्मचार्यांसोबत बसून आपला पाठिंबा दिला . तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य करुन लवकरात लवकर एस. टी.ची सुविधा सुरू करावी अशी मागणी केली .
यावेळी त्यांच्या सोबत भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट , क्रीडा संयोजक संजय पवार , स्वाती राऊळ , शासकीय सुविधा संयोजक प्रकाश वाघ , जनसंपर्क प्रभारी सदानंद पावले , प्रकाश सावंत तसेच दिव्यांग आघाडीचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)