सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शिरगांवच्या वतीने जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली.
शिरगांव / संतोष साळसकर : तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर अपघातातील शहीद झालेले भारताचे पहिले सीडीएस प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर ११ संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शिरगांव शाखेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी सैनिक शामसुंदर राणे व शाखाव्यवस्थापक राजेश सावंत यांनी जनरल बिपीन रावत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी शाखाव्यवस्थापक राजेश सावंत,माजी सैनिक शामसुंदर राणे,दमयंती राणे, कुलदीपक घाडिगांवकर,तुषार चव्हाण,सिद्धी इंदप आदींसह मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)