चिंदरमध्ये बचत गटांचे स्टाॅल रहाणार यात्रेचे मुख्य आकर्षण..!
जि प अध्यक्ष सौ संजना सावंत करणार उद्घाटन..!
चिंदर/विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर येथे १८ डिसेंबरला होणाऱ्या भगवती माऊली यात्रेत स्वयंसहाय्यता समूह चिंदर / बचत गटाच्या महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तू यांना व्यासपिठ मिळण्यासाठी स्टाँल मार्फत विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याचे उद्घाटन जिल्हापरिषद अध्यक्ष सौ.संजना संदेश सावंत यांच्या हस्ते यात्रे दिवशी सकाळी १०वाजता होणार आहे. महिलांनी बनवलेल्या घरगुती उत्पादन यात्रे निमित्त व्यासपिठ मिळावे हा मुळ उद्देश ठेवून हि संकल्पना राबवण्यात येत आहे.
सरपंच सौ.राजश्री कोदे, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ यांच्या नेतृत्वाखाली स्वरा पालकर, जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, रिया घागरे, सी.आर.पी, विनिता मसुरकर,सिध्दी पडवळ, मयुरी पारकर, दिपाली साटम
व ग्रामसंघ बचतगट तसेच उपसरपंच दिपक सुर्वे, माजी सरपंच धोंडी चिंदरकर, संतोष कोदे, व संतोष गांवकर यांच्या कडून हि संकल्पना राबवली जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)