ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री दत्तमंदिर बिडवाडी येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..!

श्री दत्तमंदिर बिडवाडी येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..!

प्रकाशन: 16 Dec 2021 02:09 AM
वाचन संख्या 56

दत्तजयंती उत्सवास उपस्थित राहण्याचे उत्सव कमिटी व ग्रामस्थांचे आवाहन

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त मंदिर बिडवाडी येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण व विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासहित साजरा होत आहे. मंगळवार दिनांक १४ डिसेंबर पासून या उत्सवाला सुरवात झाली आहे. दररोज सकाळी श्रीदत्त पूजा आरती महाप्रसाद आदींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या उत्सवात होत आहे. १६ तारीख ला श्रींची पूजा आरती व महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी बिडवाडी येथील महिलांसाठी होममिनिस्टर तर रात्री ह. भ. प. चिंतामणी सामंत बुवा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता पालखी प्रदक्षिणा, शुक्रवार दिनांक १७ रोजी धार्मिक विधींसोबत ग्रामस्थांची भजने व रात्री कीर्तन होणार आहे. त्यासोबत श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. शनिवार दिनांक १८ रोजी सकाळी धार्मिक विधी आरती, महाप्रसाद त्यानंतर कीर्तन सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व रात्रौ दशावतार नाटक होणार आहे. रविवार दिनांक २० रोजी दुपारी महाप्रसाद त्यानंतर सांगता समारंभ होणार आहे संपूर्ण उत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा होत असूनया सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरुदेव दत्त उत्सव कमिटी बिडवाडी व बिडवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स