ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
बांद्यातील सुविख्यात श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानचा जत्रोत्सव १९ डिसेंबरला ..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांद्यातील सुविख्यात श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानचा जत्रोत्सव १९ डिसेंबरला ..!

प्रकाशन: 16 Dec 2021 02:19 AM
वाचन संख्या 63

बांदा | राकेश परब : बांदा येथील प्रसिद्ध श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे  जत्रोत्सवा पासुन श्री बांदेश्वराच्या दर सोमवारी होणाऱ्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.
 रविवार दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी श्री बांदेश्वर श्री भुमिका मंदिरात पुजा अर्चा होऊन दर्शन, श्री भुमिका माऊली ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे कार्यक्रमास आरंभ होईल. रात्रौ ठिक ९.३० वाजता श्रींचा मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा आरंभ होईल. पालखी सोहळा झाल्यानंतर वार्षिक नित्य पुराण वाचन कार्यक्रमाची सांगता होईल . त्यानंतर जत्रोत्सवानिमित्त खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.सोमवार दि.२० डिसेंबर रोजी पहाटे दहिकाला होईल.त्यानंतर वाजत गाजत श्रींची पालखी फेरी नदीघाटावर श्रीकृष्ण स्नानासाठी जाईल व स्नान करुन पारंपारिक मार्गाने मंदिराकडे परत येईल. सोमवार असल्यामुळे  रात्री ९ वाजता श्री मंदिराभोवती सवाद्य पालखी फेरी होईल.
मंगळवार दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी  समाराधना कार्यक्रम होईल.भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर भुमिका देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स