महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभिनयान अंतर्गत राज्यात रथयात्रेला सुरुवात
जामसंडे, कुणकेश्वर,शिरगाव येथे जल्लोषात फटाक्यांच्या ,आतषबाजीत जंगी स्वागत
शिरगाव/संतोष साळसकर: महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने समाज जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण राज्यात रथयात्रेस बुध.८ डिसें.रोजी स.११.३० वा. संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त संताजी महाराज यांच्या चाकण या जन्मस्थान येथून सुरुवात करण्यात आली.देवगड तालुक्यातील शिरगाव येथे आगमन होताच या रथयात्रेचे जल्लोषात फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. या रथयात्रेत संताजी महाराज यांची मूर्ती,पूजा पादुका,हस्तलिखित गाथा यांचे तेलीबांधवांनी पूजा करून दर्शन घेतले. यावेळी महिलावर्गाची उपस्थिती लाक्षणीय होती.सदर रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व तेली समाज बंधू-भगिनींना,प्रस्थापित समाज मंडळे व समजेतर बांधवानाही श्री संताजी महाराजांचे चरित्र महती कळावी व समाज संघटित होऊन समाजाचा विकास होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे खा.रामदास तडस यांची आवाहन केले.कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने सुरू केलेल्या तेली समाजाच्या अँप द्वारे समाजाची महाराष्ट्रभर जनगणना व्हावी व समाजाचा डाटा गोळा करणे गरजेचे आहे असे सांगितले.महासचिव डॉ.भूषण कर्डीले यांनी ओबीसीवर सतत होत असलेल्या अन्यायबाबत वेगवेगळ्या मार्गाने वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागले तरी चालेल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या असून या निवडणुकीमध्ये ओबीसींवर राजकीय आरक्षणाचा मोठा घाला आला आहे.सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे २७टक्के आरक्षण त्याठिकाणी नाकारले असून त्यासाठी इम्पीरिकल डाटा देण्याची मागणी केली असून सदर डाटा जोपर्यंत राज्य सरकार सुप्रीम कोर्टात सादर करत नाही तोपर्यंत ओबीसींचे आरक्षण मान्य करायला सुप्रीम कोर्ट तयार नाही.त्यामुळे येत्या निवडणुकामध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार नाही.ओबीसी समाजामध्ये जागृती व्हावी स्वतःच्या हक्कासाठी,न्यायासाठी व अधिकारासाठी लढा उभारावा या भूमिकेतून समाज रथयात्रा व ओबीसी जनजागर अभियान सुरू करण्यात आले आहे असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डीले,राज्य समन्वयक सुनील चौधरी,युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी,महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली,जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्ष तुकाराम तेली,देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष अशोक तेली,खजिनदार नारायण हिंदळेकर,सचिव विजय शेट्ये, राजेंद्र शेट्ये, पुंडलिक शेट्ये,मधुकर कुवळेकर,निलेश शेट्ये,शिवतेज शेट्ये, विनोद शेट्ये, नितेश तेली, विशाल कुवळेकर,विनायक कुवळेकर, विवेक जामसंडेकर,गणेश शेट्ये, प्रदीप वाडेकर,रवी चांदोस्कर आदींसह मोठ्यासंख्येने तेली समाज बांधव,महिलावर्ग उपस्थित होते.यावेळी संताजी जगनाडे महाराजांचा विजय असो. अशा घोषणा देत शिरगाव येथील विशाल कुवळेकर यांच्या निवसस्थानापासून ते शिरगाव हायस्कुल पर्यंत रथयात्रा काढण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)