हडपीड स्वामी समर्थ मठ येथे १८ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात १८ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत गणेश पूजा, पादुकापूजन , अभिषेक व होमहवन, सकाळी १० ते ११:३० पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १११ मूर्तीवर ११११ वेळा नाम घोष व दुग्धाभिषेक स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ११:३० ते १२:३० पालखी सोहळा, दुपारी १२:३० महाआरती, दुपारी १:३० ते २:३० महाप्रसाद, दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत विविध भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत. दत्तजयंती उत्सवास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परीवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ हडपीड मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे , संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त ज्ञानेश्वर राऊत , कार्यकारी मंडळ मुंबई व गाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)