आनंदव्हाळ येथे ओरोस ला जाणाऱ्या एसटी बसवर दगडफेक. दोन अज्ञात व्यक्तींनी मारले दगड ; एसटी बस ओरोसला मार्गस्थ
चौके/( प्रतिनिधी ) : दि १४ रोजी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात मागील दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातही मागील ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली असून सोमवारी मालवण आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने मालवण ओरोस मार्गावर पहिली एसटी बस धावली. दरम्यान मंगळवारी ९.०५ वाजता मालवण आगारातून निघालेल्या मालवण ओरोस एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथे घडली आहे. दोघा अज्ञात व्यक्तींकडून ही दगडफेक झाली असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली. सदर व्यक्ती रेनकोट परिधान केलेल्या होत्या अशी माहिती मिळते. ओऱोस जिल्हा मुख्यालय बस फेरीच्या दुसऱ्या दिवशी ही दगडफेक झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची गंभीर दखल घेण्यात येणार आहे. यानंतर सदर एसटी बस शासकीय कर्मचारी असल्याने ओरस जिल्हा मुख्यालय येथे मार्गस्थ झाली. सांयकाळी बस डेपोमध्ये आल्यावर अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुखानी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)