ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिपक बेलवलकर कणकवली नगरपंचायतचे “ब्रँड ॲम्बेसिडर” नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीबद्दल सत्कार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दिपक बेलवलकर कणकवली नगरपंचायतचे “ब्रँड ॲम्बेसिडर” नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीबद्दल सत्कार

प्रकाशन: 13 Dec 2021 07:32 PM
वाचन संख्या 31

कणकवली / उमेश परब – स्वच्छ सर्वेक्षण २०२२मध्ये कणकवली नगरपंचायत अंतर्गत “ब्रँड ॲम्बेसिडर” म्हणून कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेलवलकर यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांनी अभिनंदन केले आहे. कणकवली शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत विविध उपक्रम राबविणे व जनसामान्यांमध्ये स्वच्छते बद्दल जागृती करून कणकवली शहर देशात, राज्यात अव्वल स्थानी आणण्या करिता नगरपंचायत च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व ब्रँड ॲम्बेसिडर दिपक बेलवलकर यांनी सांगितले. या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, प्रतिश खैरे, सतीश कांबळे, मनोज धुमाळे, अमोल भोगले आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स