ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सिंधुदुर्गात सापडला अतिजहाल व दुर्मिळ किंग कोब्रा

सिंधुदुर्गात सापडला अतिजहाल व दुर्मिळ किंग कोब्रा

प्रकाशन: 11 Aug 2021 01:51 PM
वाचन संख्या 266

ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्यातील दोडामार्ग- वझरे येथे अजस्त्र किंग कोब्रा बांबूच्या बेटात आढळला. हा किंग कोब्रा तब्बल १२ फूट असून एवढा मोठा सर्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडण्याची बहुधा पहिलीच घटना असावी. या अवाढव्य व दुर्मिळ सापाला सर्पमित्र राहुल निरलगी यांनी शिताफीने पकडले.
वझरे येथील नागरिकांच्या वस्तीत बांबूच्या बेटात हा महाकाय साप दिसून आला. सर्प इंडिया संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी चित्रा पेडणेकर यांनी या बाबत ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर श्रीमती पेडणेकर यांनी वनविभागाचे अधिकारी सर्पमित्र राहुल निरलगी याना घटनास्थळी बोलवले.
श्री. निरलगे यांनी घटनास्थळी जात या १२ फूटी विशालकाय किंग कोब्राला मोठ्या शिताफीने पकडले. दोडमार्ग तालुक्यात राहुल निरलगे यांनी प्रथमच हा रेस्क्यू केला आहे अशी माहिती सर्प इंडिया संस्थेचे प्रमुख चित्रा पेडणेकर यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स