ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत श्रेया चांदरकर राज्यात द्वितीय..

राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत श्रेया चांदरकर राज्यात द्वितीय..

प्रकाशन: 11 Aug 2021 11:00 AM
वाचन संख्या 77

वराडकर हायस्कूल कट्टाची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी
चौके |प्रतिनिधी : वनसंवर्धन दिनानिमित्त वनविभाग उमरखेड जिल्हा यवतमाळ तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था उमरखेड जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची  इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
           सदर स्पर्धेत राज्यभरातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या ५४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून भविष्यातील मानवाच्या वाटचालीसाठी वनसंवर्धन कसे महत्वाचे आहे हे सांगितले आहे त्याचबरोबर वनसंवर्धनाच्या नवनवीन संकल्पना रेखाटल्या. एकापेक्षा एक सरस अशा शेकडो कलाकृतींमधून उत्कृष्ट कलाकृती निवडण्याचे काम धनुष्य संस्थेचे सचिव गजानन वानखेडे मास्टर ऑफ फाईन आर्ट , व सदस्य कमलेश राठोड बॅचलर ऑफ फाईन आर्ट यांनी केले. व्यंगचित्रकार तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे अमरावती विभाग अध्यक्ष प्रभाकर दिघेवार यांच्या संकल्पना व पुढाकारातून तसेच वन अधिकारी अमोल थोरात यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत श्रेया चांदरकर हिने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. श्रेया ही वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांची मुलगी आहे.
          श्रेयाच्या या यशाबद्दल वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे मुख्याध्यापक एन. के. कांबळे सर तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर  व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स