३० शिक्षकांचा शिक्षक भारतीत प्रवेश.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या कार्याने प्रभावित होवून जिल्हाभरातील अनेक प्राथमिक शिक्षक भारतीत प्रवेश करत आहेत. याचाच एक भाग म्हणून कुडाळ तालुक्यातील तीस शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेत प्रवेश केला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे. मराठा मंगल कार्यालय कुडाळ येथे झालेल्या सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती,शाखा कुडाळ या संघटनेची निवडलेली नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष श्री. योगेश देशमुख, श्री. रामचंद्र धुरी (सचिव),सौ. प्रीती सावंत(महिला आघाडी अध्यक्ष),श्रीम.रश्मी गुरनुले(महिला आघाडी सचिव),श्री. अमित परब(कार्याध्यक्ष),श्री.प्रमोद भोई(कोषाध्यक्ष) तर उपाध्यक्ष पदी श्री. यशवंत राणे,श्री.भाऊसाहेब घोडे,श्री. चेतन मागाडे,श्री.हरिश्चंद्र घाडी यांची नेमणूक करण्यात आली. महिला आघाडी उपाध्यक्षपदी श्रीम. यशश्री सावंत व श्रीम. अंजनी सुतार श्री. गणेश पाताडे(कार्यालयीन सचिव), श्री.वासुदेव वारंग व श्री. प्रज्योत सावंत (सहसचिव), विभागीय अध्यक्ष म्हणून संदीप शिंगाडे, शशिकांत डांगरे, अर्जुन परब व नितीन गायकवाड यांची निवड करण्यात आली.जिल्हाप्रतिनिधी म्हणून श्री. मंगेश बागवे,श्रीम.जयश्री दोडके, श्री. संजयकुमार घाडीगांवकर, श्री. रुपेश वालावलकर यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार पदी श्री. कृष्णा पानझडे,तालुका संघटक म्हणून श्री. अमोल चेपूरवार, श्री. विनायक हारगे, श्री. माधव थोटे श्री.संजीव चौरे, श्री. गंगाधर पवार, श्री.महेश लांडगे, श्रीम. विशाखा सावंत, श्रीम. मनीषा टिळवे,श्रीम.नीलम बोर्डवेकर,सारिका कुडाळकर यांची निवड करण्यात आली यावेळी राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, मुख्य सल्लागार महेश नाईक,जिल्हा मुख्य संघटक रामचंद्र डोईफोडे, जिल्हा कार्य.सचिव दिनकर शिरवलकर जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र सातवसे,सिद्धार्थ नेरूरकर व लहू पाटील आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)