ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वरवडेतील वीज समस्यांबाबत ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत...

वरवडेतील वीज समस्यांबाबत ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत...

प्रकाशन: 11 Aug 2021 12:33 AM
वाचन संख्या 58

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा

कणकवली | उमेश परब :वरवडे गावामधील वीजपुरवठा गेले काही दिवस सातत्याने खंडित होत आहे. लाईट गेल्यास वायरमनपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत फोन केल्यास फोन बंद असणे, न उचलणे असे प्रकार सातत्याने घडतात. फणसवाडीतील ट्रान्सफॉर्मरचा विषय अद्याप सुटलेला नाही. लो होल्टेजची समस्या कायम आहे, याबाबत तातडीने कार्यवाही करा. यापुढे अशी समस्या उद्भवू लागल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन दिला. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी सातत्याने उद्भवणाऱ्या वीज समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रदीप घाडी, रत्नाकर देसाई, सलाउद्दीन शेख, हनुमंत बोन्द्रे, सादीक कुडाळकर, दशरथ घाडीगांवकर, विजय कदम, विवेक राणे, प्रकाश परब, गोपाळ घाडी, राजू कोदे, दिनेश अपराध, नीलेश सावंत, अनिल घाडी तसेच उपकार्यकारी अभियंता श्री. नलावडे उपस्थित होते.
गेले तीन दिवस वीजपुरवठा सातत्याने खंडित होतो. यापूर्वीही अनेकदा अशा समस्या उद्भवल्या. प्रत्येकवेळी आश्वासनांपलिकडे काहीच होत नाही. मात्र, यापुढे सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा देण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत फणसवाडी येथील ट्रान्सफॉर्मर तातडीने बुधवारी कार्यान्वीत करण्यात येईल. त्यासाठीची कार्यवाही आजपासूनच करण्यात येत असल्याचे श्री. मोहिते यांनी सांगितले. तसेच परबवाडी येथील लो होल्टेजची समस्याही निकाली काढण्यात येत आहे. अनेक ठिकाणी झाडी वाढलेली असल्याने त्याबाबतही तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली. याकरीता एक दिवस ठरवा ग्रामस्थ ट्री कटिंगसाठी मदत करतील, असे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार सोमवार १६ ऑगस्ट रोजी ट्री कटिंग करण्याचे ठरले. यावेळी लाईनसाठीचे स्पेसरही त्याचवेळी बसविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, वायरमनसहीत अधिकाऱ्यांनी फोन चालू ठेवणे, फोन उचलून माहिती देणे, लोकांच्या समस्या जाणून घेणे, याबाबत गांभीर्य दाखविण्याची मागणीही करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स