ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपा आमदार नितेश राणे स्वखर्चाने देणार सरपंचांना विमा संरक्षण..!

भाजपा आमदार नितेश राणे स्वखर्चाने देणार सरपंचांना विमा संरक्षण..!

प्रकाशन: 11 Aug 2021 12:22 AM
वाचन संख्या 48

13 ऑगस्ट ला कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील सरपंचांना होणार विमा पॉलिसीचे वितरण..

कणकवली | उमेश परब :कोरोनाच्या लढ्यात सरपंचाची विमा संरक्षणाची मागणी 13 ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. 12 जून रोजी कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यांतील सरपंचांचा आरोग्य विमा उतरवण्याची घोषणा मी केली होती.येत्या 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता प्रहार भवन येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील 169 सरपंचांना आरोग्य विमा संरक्षण पॉलिसीचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील दिड वर्षांत स्वतःच्या खिशात हात घालून गावागावातील सरपंचांनी गावातील ग्रामस्थांची काळजी घेतली.मागील गणेशोत्सवात आलेल्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेचा भार त्यांनीच पेलला होता.शासनाकडून कोणताही जादा निधी देणार नाही , पण कोरोना लढ्यात गावपातळीवर सरपंचांनी पुढाकार घ्यावा आम्ही फक्त तोंडी कौतुक करू अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.स्वतःच्या जीवावर उदार होऊन मागील दीड वर्ष अहोरात्र मेहनत घेणाऱ्या गावच्या सरपंचांना साधे विमा संरक्षणही शासनाने दिले नाही. पालकमंत्री उदय सामंत यांनी केवळ शाब्दिक आश्वासने दिली.काही गावांत स्वतः सरपंच आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबधित झाले. दुर्दैवाने काही सरपंच कोरोनाने मृत्युमुखी पडले. केवळ गावचे हित जोपासण्यासाठी बोर्डरवरील सैनिकांप्रमाणे सरपंच कोरोना लढाईत लढत आहेत. राज्य सरकारकडून होत नसेल तर स्वतःच्या पैशांनी मी सरपंचांना विमा संरक्षण देईन असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र पालकमंत्र्यांनी आपला शब्द अद्याप पाळला नाही. याबाबत काही तरतूद केली नाही. पालकमंत्री सामंत हे कॅबिनेट मंत्री आणि पेशाने व्यावसायिक असूनही त्यानी याबाबत काहीही केले नाही. मात्र जेव्हा राणेंच्या ताब्यातील जिल्हा परिषद सदस्य फोडण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यासाठी 25 लाखांची ऑफर देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत.फोडाफोडीसाठी, राजकारणासाठी सत्ताधारी पालकमंत्र्यांकडे पैसे आहेत मग सिंधुदुर्गातील सरपंचांचे विमे उतरण्यासाठी पैसे नाहीत का ? असा सवाल आमदार नितेश राणेंनी केला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत सरपंचांना या आरोग्य विम्याचा फायदाच होईल. हा विमा जरी 1 वर्ष मुदतीचा असला तरी गरज भासल्यास पुढील वर्षी या विमा पॉलिसीचे नूतनीकरण केले जाईल, असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स