ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रगत सिंधुदुर्ग व श्रीमती मनोरमा चौधरी ट्रस्टच्या वतीने पद्मश्री परशुराम गंगावणे व ऍड संग्राम देसाई यांना  विशेष पुरस्काराने सन्मानित
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्रगत सिंधुदुर्ग व श्रीमती मनोरमा चौधरी ट्रस्टच्या वतीने पद्मश्री परशुराम गंगावणे व ऍड संग्राम देसाई यांना विशेष पुरस्काराने सन्मानित

प्रकाशन: 05 Dec 2021 01:48 PM
वाचन संख्या 37

शिरगाव/संतोष साळसकर: सिंधुदुर्ग कुडाळचे सुपुत्र परशुराम गंगावणे यांना राष्ट्रपतींचे हस्ते पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याबद्दल प्रगत सिंधुदुर्ग मुंबई व श्रीम.मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दयानंद चौधरी,सचिव संदीप साळसकर,सदस्य प्रभाकर चव्हाण.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र एड. संग्राम देसाई यांची महाराष्ट्र, गोवा, दीव दमण, राज्याचे बार कौन्सिलचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही शाल श्रीफळ व विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी, एड.अजित भणगे, जि.प.मा.उपाध्यक्ष रणजित देसाई, उद्योगपती बापू नाईक, सरपंच निलेश साळसकर, उपसरपंच संदेश मटकर, पं.स.सदस्य प्राजक्ता प्रभू, राजा प्रभु, व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स