ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा दिंव्यांग आघाडी - सिंधुदुर्गच्या पदाधिकारयांची निवड जाहीर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा दिंव्यांग आघाडी - सिंधुदुर्गच्या पदाधिकारयांची निवड जाहीर

प्रकाशन: 05 Dec 2021 09:02 AM
वाचन संख्या 58

जागतिक अपंग दिनानिमीत्त आयोजित दिंव्यांग मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात आली.

ब्यूरो न्यूज/ विवेक परब : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भाजपा दिंव्यांग आघाडीच्या वतीने जिल्हास्तरीय दिंव्यांग मेळाव्याचे आयोजन वेंगुर्ले येथे साई मंगल कार्यालयात करण्यात आले होते . या मेळाव्यात ३०० ते ३५० दिंव्यांग बांधव / भगिनी यांची उपस्थिती होती . यावेळी भाजपा दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली . यावेळी *जिल्हा सहसंयोजक* म्हणून शामसुंदर नारायण लोट ( भडगाव – कुडाळ ) व सुनील तांबे ( असलदे – कणकवली ) यांची निवड जाहीर केली . तसेच *जनसंपर्क संयोजकपदी* सदानंद पावले ( आंब्रड – कुडाळ ) , *क्रीडा संयोजक* – संजय पवार ( डिगस – कुडाळ ) व स्वाती राऊळ ( कुसगाव – कुडाळ ) , *शासकीय सुविधा संयोजक*- प्रकाश वाघ ( तरंदळे – कणकवली ) .तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये *तालुका संयोजक* नेमण्यात आले . *वेंगुर्ले – संयोजक* भुषण तुळसकर ( तुळस ) *सहसंयोजक* – भरत चंद्रकांत परब ( कुशेवाडा – परुळे ) *कणकवली संयोजक*- प्रकाश सावंत ( तरंदळे ) *मालवण संयोजक*- मुरारी पाटकर ( वराड ) *सहसंयोजक* – उदय भोगावकर ( कुंभारमाठ ) *देवगड संयोजक*- प्रशांत कदम ( आंबेखोल – शिरगाव ) *सहसंयोजक*- उज्वला दुसनकर ( जामसंडे ) यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर , जि. का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील , रविंद्र शिरसाठ इत्यादी उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स