ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ,मा.उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ,मा.उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा

प्रकाशन: 04 Dec 2021 09:45 PM
वाचन संख्या 42

ओराेस/ प्रतिनिधी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा व कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.रविवार दि. ५ डिसेंबर२०२१ रोजी सकाळी ७:०० वा. रत्नागिरी येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण. सकाळी १०:०० वा. सौरभ माने यांचे निवासस्थान जामसंडे येथे देवगड – जामसंडे नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी १२:०० वा. शिवसेना शाखा वैभववाडी येथे वैभववाडी नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी १:१५ वा. वैभववाडी येथून मोटारीने ओरस – सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी २:१५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोविड १९/ : ओमिक्रॉन अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण संदर्भात आढावा. दुपारी ३.०० वा. आमदार वैभव नाईक यांच्या समवेत कुडाळ शहर येथे कुडाळ शहर कविलगांव बाजारपेठ, भैरववाडी, लक्ष्मीवाडी, श्रीरामवाडी – प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. दुपारी ४:००वा. कुडाळ शहर येथून मोटारीने आडाळी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळकडे प्रयाण.दुपारी ४:३० वा. आडाळी एम.आय.डी.सी. येथे भेट. दुपारी ५:०० वा. आडाळी येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण. दुपारी ५:१५ वा. वसंत सांस्कृतिक केंद्र, दोडामार्ग आई रोड येथे आमदार दीपक केसरकर यांच्या समवेत कसई – दोडामार्ग प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. सायं. ६:१५ वा. दोडामार्ग येथून मोटारीने गोवा विमानतळ, दाभोलीकडे प्रयाण.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स