ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगडात राबविणार कणकवली पॅटर्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगडात राबविणार कणकवली पॅटर्न

प्रकाशन: 04 Dec 2021 08:12 PM
वाचन संख्या 55

निवडणूक पक्षनिरीक्षक पदी समीर नलावडे.

कणकवली / उमेश परब – कणकवली नगरपंचायत निवडणुकीत समोर तगडे प्रतिस्पर्धी असताना एक हाती सत्ता आणून सर्वांनाच धक्का देणारे कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष समीर नलावडे यांची देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूकीत पक्षनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नेहमीच आगळी वेगळी योजना आखून विरोधकांना धूळ चारणाऱ्या कणकवली देवगड मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांची ही उपयुक्त खेळी असल्याची सर्वत्र चर्चा आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे यांच्या समोर तगडे उमेदवार उभे होते. सर्व पक्ष तसेच गाव पॅनल यामुळे मत विभागणी अपेक्षित होती मात्र समीर नलावडे यांनी न डगमगता विरोधक म्हणून उभे ठाकलेल्या तगड्या उमेदवारांचा पराभव करत कणकवली नगरपंचायतची सत्ता पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या विचारांची बनवली. समीर नलावडे यांनी आपल्या सोबतचे जुने व नवखे उमेदवार यांच्या विजयासाठी अथक मेहनत घेतली त्या सोबत राजकीय रणनीती आखत एक हाती सत्ता स्थापन केली. हाच कणकवली पॅटर्न देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत वापरण्यात यावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची नियुक्ती केली आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत ही सध्या भाजपच्या ताब्यात आहे मात्र यावेळी कोणतीही जोखीम न घेता १७ पैकी १७ उमेदवार निवडून आणावे या हेतूने आमदार नितेश राणे यांनी निवडणुकीची जबाबदारी समीर नलावडे यांच्याकडे सोपविली आहे. आणि ह्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप विजयी होईल असा विश्वास वर्तविला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स