ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
'बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन' 2021ची जान ठरले सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन' 2021ची जान ठरले सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान..!

प्रकाशन: 02 Dec 2021 04:58 PM
वाचन संख्या 94

कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):रक्तदान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि संपूर्ण सिंधुदुर्गात रक्तदान अवयवदान देहदान व रुग्णमित्र चळवळ उभी केल्याने ‘बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन’ महाराष्ट्र यांचा राष्ट्रीय पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2021 तासगाव येथे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच गोवा, बेळगाव, मुंबई,पुणे वा उर्वरीत महाराष्ट्रातही रक्तसेवा दिली आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाचे सर्वाधीक दाते शोधण्याचे कामही संस्थेने केले आहे, या जागतिक दुर्मिळ रक्तगटाचे दाते आज प्रतिष्ठानकडे आहेत, आवश्यकतेनुसार ते जिल्हा राज्यच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही रक्तदान करु शकतात, प्रतिष्ठानने ही “बॉम्बे ब्लड ग्रुप” रक्तदाते शोध मोहिम सातत्याने सुरु ठेवली आहे. या सर्व कार्याची दखल घेवुन बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने प्रतिष्ठानला राष्ट्रीय पुरस्काराचे मानपत्र देवून सन्मानीत केले आहे.यावेळी सुधीर कांबळी व सपना पडवळ या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदात्यांनाही नॅशनल अॕवॉर्डने सन्मानित करण्यात आले.सांगली तासगाव येथील सोहळ्यात देशातील २२ राज्यातील संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातून कार्यकर्ते उपस्थित होते, त्याच प्रमाणे बिहार, राजस्थान, छत्तीसगड, खांडवा,जम्मु, पंजाब, हिमाचल प्रदेश, हैदराबाद तेलंगणा,सहारनपुर उत्तर प्रदेश, इत्यादी २२ राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक विक्रम यादव,धनंजय कुलकर्णी,चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, तहसीलदार रवींद्र रांजणे, माय लॅबडिस्कवरी सोल्युशन चे श्रीकांत पाटोळे, पोलीस अधीक्षक अश्विनी शेंगडे, संजीव कुलकर्णी , मनोज इंगळकर सर आणि अमोल पवार सर उपस्थित होते.हा पुरस्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, जिल्हा सल्लागार उद्धव गोरे, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदाते सुधीर कांबळी व सपना पडवळ, तसेच संस्थेचे रक्तमित्र रामदास मालवणकर या टीमने स्वीकारला.या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रतिष्ठानचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी सर्व टिमचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स