ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आ. वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आ. वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

प्रकाशन: 02 Dec 2021 06:52 PM
वाचन संख्या 41

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाबँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणुक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीकडून सतीश सावंत, सुशांत नाईक, विद्याप्रसाद बांदेकर, व्हिक्टर डांटस, दिगंबर पाटील, अनारोजी लोबो, नीता राणे, आत्माराम ओटवणेकर, विनोद मर्गज, सुरेश दळवी, एम. के. गावडे, बाबा आंगणे, मेघनाथ धुरी, मनीष पारकर, विकास सावंत, सखाराम ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.याप्रसंगी आ. वैभव नाईक म्हणाले, सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. शेतकरी, विद्यार्थी, इतर सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना जिल्हा बँकेने राबविल्या आहेत. जिल्हा बँकेच्या चांगल्या कामगिरी मुळे अनेक पुरस्कार बँकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे केलेल्या कामगिरीच्या जोरावर मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहतील आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,प्रसन्ना कुबल, प्रसाद रेगे, समीर हडकर, बंडू ठाकूर, आशिष परब, अशोक नांदोस्कर, भास्कर राणे, भूषण परुळेकर,छोटू पारकर, मुरलीधर नाईक, संकेत नाईक,श्रीकांत राणे आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स