ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मण्यार...मोटारसायकल आणि शिरगांव बाजार...!

मण्यार...मोटारसायकल आणि शिरगांव बाजार...!

प्रकाशन: 01 Dec 2021 01:04 PM
वाचन संख्या 232

शिरगांव |संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगांवचा आज बाजाराचा दिवस असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी होती.येथील बँक ऑफ इंडिया जवळ एका ग्राहकाच्या मोटरसायकल मध्ये साप दडून बसल्याचे कळताच सर्वांची एकच धावपळ सुरू झाली.कुणीच त्या मोटारसायकल जवळ जाण्यास तयार होईना.त्या सापाला बाहेर काढण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करीत होता.अखेर एक तासाच्या या प्रयत्नानंतर अखेर शिरगांव येथील सर्पमित्र विक्रम विलासराव ऐनापुरे यांना बोलविण्यात आले.त्यानंतर विक्रम ऐनापुरे यांनी मोटारसायकलची सीट उघडल्यानंतर त्यांना “मण्यार”जातीचा विषारी साप आत दडून बसला असल्याचे समजले. त्याला त्यांनी बाहेर काढण्यात यश मिळविले,पण मण्यार जातीचा साप हा खूप चपळ असतो.त्यामुळे त्याला पकडण्या अगोदरच त्याने बाजूच्या बिळात प्रवेश केला.आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला.येथील सर्पमित्र विक्रम ऐनापुरे यांनी यापूर्वी अनेक मोठमोठे विषारी साप पकडून त्यांना जंगलात सुखरूप सोडले आहेत.काहींच्या घरात अडगळीत दडून बसलेल्या मोठ्या विषारी सापांनाही त्यांनी पकडून जंगलात सोडून जीवदान दिले आहे. जिल्ह्यात वीस वर्षांपूर्वी “एका सिबीझी मोटारसायकलमध्ये साप असल्याची” बातमी पसरली होती…त्याची पुष्टी मात्र नीटशी झाली नव्हती परंतु शिरगांवमधील हा मण्यार मोटारसायकलमध्ये असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी फोटोद्वारा दाखवून दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स