ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
३१ व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट...!

३१ व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट...!

प्रकाशन: 01 Dec 2021 07:43 PM
वाचन संख्या 85

किशोरांचे १० वे तर किशोरींचे १५ वे अजिंक्यपद…

उना (हिमाचल प्रदेश) | क्रिडा ब्युरो : ३१ व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने उना, हिमाचल प्रदेश येथील इंदिरा गांधी स्टेडीयमवर इतिहास रचला. आज झालेल्या अंतीम फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी कर्नाटकवर तर किशोरींनी पंजाबवर विजय मिळवत दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवले. किशोर गटाने आतापर्यंत १० वेळा तर किशोरीने गटाने १५ वेळा विजेतेपद पटकाविली आहेत. किशोर गटाने सलग ६ वेळा विजेतेपद कायम राखले आहे. झारखंड येथे मागील वर्षे झालेल्या स्पर्धेत किशोरींना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ती कटू आठवण या विजयाने पुसून काढली. तर या वेळी महाराष्ट्राला मिळवलेले हे सहावे दुहेरी अजिंक्यपद आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भरत पुरस्कार आशिष गौतमला तर ईला पुरस्कार सानिका चाफेला देऊन गौरवण्यात आले.
आजच्या अंतीम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने कर्नाटकवर १०-०६ असा एक डाव ४ गुणांनी विजय मिळवत कर्नाटकचा धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राने सुरवातीपासूनच कर्नाटकला डोक वर काढण्याची जराही संधी दिली नाही. महाराष्ट्राच्या आशिष गौतम (२:१०, ३:१० मि. संरक्षण व १ गडी), जितेंद्र वसावे (२:००, १:३० मि. संरक्षण), हाराद्या वसावे (१:२०, २:०० मि. संरक्षण व २ गडी), अथर्व पाटील (नाबाद १:३० मि. संरक्षण) व मोहन चव्हाण (३ गडी) व कर्णधार सोत्या वळवी (२ गडी) व राज जाधव (२ गडी) यांनी विजयात चमकदार खेळी केली. तर पराभूत कर्नाटकच्या प्रीथम (१:१० मि. संरक्षण व २ गडी), पी. गुरूबत (१ मि. संरक्षण व १ गडी) व एल. व्ही. समर्थ (१:१० मि. संरक्षण) यांनी केलेली खेळी त्यांना मोठ्या परभवापासून वाचवू शकली नाही. महाराष्ट्राचे संघ प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे, व्यवस्थापक मंदार परब व फिजिओ डॉ. किरण वाघ यांनी हा सांघिक विजय असल्याचे संगितले.

महाराष्ट्राच्या किशोरींनी अंतीम फेरीच्या सामन्यात पंजाबला ११-०३ असा एक डाव ८ गुणांनी धूळ चारली. या स्पर्धेतील सर्व सामने डावाने जिंकले होते त्यात प्रकशिक्षक मुंबईच्या एजाज शेख यांचा मोठा वाटा आहे. कोविड पार्श्वभूमीवर छोटे खेळाडू जवळजवळ दिड-दोन वर्षे मैदानात नव्हते. अशा वेळी खेळाडुंमध्ये समन्वय घडवणे व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्याकडून अप्रतिम कामगिरी घडवून घेणे हे काम एजाज शेख यांनी अतिशय उत्कृष्ट पणे पार पाडले. महाराष्ट्राच्या कर्णधार सानिका चाफे (५:५०, नाबाद ३:१० मि. संरक्षण व ४ बळी), सुषमा चौधरी (नाबाद १:१०, २:५० मि. संरक्षण व १ बळी), धनश्री कंक (१:०० मि. संरक्षण) व अंकिता देवकर (४ बळी), धनश्री करे (१ बळी), समृध्दी पाटील (१ बळी) यांनी महाराष्ट्राच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली. तर पंजाबच्या स्नेहप्रीत कौर (१:३० मि. संरक्षण व १ बळी) व संजना देवी (१:३० मि. संरक्षण) करत एकाकी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण पंजाबच्या इतर खेळाडूंना महाराष्ट्राच्या खेळाडूंसमोर मैदानात टिकाव धरता आला नाही हेच खरे. या विजयानंतर प्रशिक्षक एजाज शेख व व्यवस्थापिका प्रियांका चव्हाण यांनी या चमकदार कामगिरीवर समाधान व्यक्त केले.
भारतीय खो खो महासंघाचे संयुक्त सचिव डॉ. चंद्रजीत जाधव व महाराष्ट्र खो खो असो.चे सचिव एडव्होकेट गोविंद शर्मा यांनी या महाराष्ट्र व हिमाचल प्रदेश येथील प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या विजयाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचे अभिनंदन केले आहे. कोविड पार्श्वभूमीवर मिळवलेले हे दोन्ही विजय खो-खो ला एक वेगळी दिशा दिल्याचे संगितले.
या पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने हरयाणाचा १३-०७ असा एक डाव ६ गुणांनी धुव्वा उडवला. तर किशोरींनी दिल्लीचा १०-०६ असा ४ गुणांनी पराभव केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स